भिवंडी, मुंबई – ९ फेब्रुवारी २०२५ जळगावच्या मनस्वी तायडे हिने "खेलो इंडिया अस्मिता" राज्यस्तरीय ऊशु निवड चाचणी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ऑल महाराष्ट्र ऊशु असोसिएशन, पुणे द्वारा आयोजित ही स्पर्धा भिवंडी, मुंबई येथे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रभरातून खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मनस्वीने सांशू प्रकारात ५६ किलो आतील वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
मनस्वी जळगाव जिल्हा पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू असून तिच्या या विजयाबद्दल जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवाल, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे, रावसाहेब गायकवाड आणि पप्पू देसले यांनी तिचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/जंजाळे, जागृती काळे/महाजन आणि राजेंद्र जंजाळे यांचे मार्गदर्शन लाभले. मनस्वीच्या या विजयाने जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
