दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम( हात, पाय, कॅलिपर्स) अवयव वितरण शिबिर संपन्न..

दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम( हात, पाय, कॅलिपर्स) अवयव वितरण शिबिर संपन्न..

५८० दिव्यांग बांधवांना मिळाला लाभ.

जळगाव :- समदृष्टी क्षमता विकास मंडळ(सक्षम) प्रबोधिनी ही नागपूरची संस्था दिव्यांग क्षेत्रात दिव्यांगांच्या सर्वागिण विकासासाठी संपूर्ण देशात कार्यरत असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करत असते यामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, पुनर्वसन तसेच प्रवर्गानुसार वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वितरण चा समावेश आहे.

दिव्यांग बांधवांसाठी ही शिबिरे देवगिरी प्रांत मध्ये लातूर पासून सुरू झाली. मराठवाड्यानंतर जळगाव जिह्यातील दिव्यांगाना देखील या शिबिराचा लाभ मिळाला.पुढील महिन्यात धुळे जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

डॉ.धर्मेंद्र पाटील उपाध्यक्ष ,सक्षम ,देवगिरी प्रांत.

याचाच एक भाग म्हणून सक्षम शाखा जळगाव,सक्षम देवगिरी प्रांत, केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव, समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव, अलीमको आणि आर. एस. ट्रस्ट मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचे आयोजन दि. १९ एप्रिल ते दि. २९ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते.

शिबिराची सुरुवात दि. १९ एप्रिल २०२५ रोजी राज्याचे जलसंपदामंत्री ना .गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.

या शिबिरामध्ये केवळ पात्र दिव्यांग बांधवांना फोन करून तालुकास्तरावर आयोजित शिबिरांमध्ये बोलाविण्यात आले.दिव्यांगाना लागणाऱ्या कृत्रिम हात ,पाय यांचे जागेवरच मोज माप घेऊन तत्काळ त्यांना आवश्यक ते अवयव देण्यात आले. तालुकानिहाय आयोजित या शिबिरात संपूर्ण जिल्ह्य़ात एकूण ५८० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

तालुकास्तरावर शिबिर नियोजनाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी उचलली.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी सक्षम देवगिरी प्रांत चे उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, सक्षम जळगाव शाखेच्या अध्यक्ष मा. मिनाक्षीताई निकम कोषाध्यक्ष डॉ. राहुल मयूर सर केशव स्मृती प्रतिष्ठान चे प्रशासन अधीकारी भानुदास येवलेकर, देवगिरी प्रांत चे प्रणव प्रकोष्ठ प्रमुख पद्माकर इंगळे आणि विनोद कोळी यांनी परिश्रम घेतले.