भील समाज विकास मंचचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे यांच्या असंख्य समाज बांधवांसोबत भाजप मध्ये केला प्रवेश.

भील समाज विकास मंचचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे यांच्या असंख्य समाज बांधवांसोबत भाजप मध्ये केला प्रवेश.

प्रतिनिधी - एरंडोल येथील भिका समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजप च्या व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मध्ये असंख्य समाज बांधवांसोबत पक्ष प्रवेश केला.

      दिपक अहिरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष होते.ते एरंडोल नगर परिषद पंचवार्षिक च्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार होते.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासून माजी मंत्री डॉ. सतिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले परंतु पक्षाने आपल्याला डावलल्यामुळे तालुक्यातील आदिवासी समाज नाराज झाला असून मी भाजप मध्ये जाण्याचा विचार केला असल्याचे अहिरे यांनी सांगितले.यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष कार्य निष्ठेने करणार असल्याचे सांगितले व भविष्यात समाजासाठी योग्य संधी भाजपच्या माध्यमातून मिळाल्यास ती स्वीकारणार असल्याचे सांगितले.

        यावेळी जळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी,सुनील भैया पाटील,तालुकाध्यक्ष योगेश महाजन,एस.आर.पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी,प्रमोद चौधरी आदी भाजप पदाधिकारी व शहरातील सुमारे ७ ते ८ आदिवासी वस्तीमधील आदिवासी समाजाचे युवक व दिपक अहिरे,सागर वाघ, मधुकर सोनवणे,रोशन भोई,दिपक सुर्यवंशी, किरण महाजन, विजय भोई,भोला अहिरे,गोरख पवार,नितिन भोई, विष्णू मोरे,चेतन भोई, लश्मण जावळे, विष्णू वाघ, राहुल मोरे, मोतीराम मालचे,आबा गायकवाड, कुणाल अहिरे, गणेश मालचे,मंगल वाघ,राजू मोरे आदी उपस्थित होते याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार कामाला लागा व भविष्यात आदिवासी समाजासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असल्याचे सांगितले.