श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे नि:शुल्क योग शिबिराचे उद्घाटन.

श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे नि:शुल्क योग शिबिराचे उद्घाटन.

एरंडोल (प्रतिनिधी)/प्रमोद चौधरी : श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे दि. ८ एप्रिल २०२६ रोजी नि:शुल्क योग शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. हे शिबिर दादासाहेब दि. शं. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल तसेच मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष दादासाहेब अमित पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतात योग ही अत्यंत प्राचीन भारतीय विद्या असून नियमित योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि शरीर सुदृढ राहते, असे सांगितले. तसेच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल योग प्रशिक्षिका व संपूर्ण स्टाफचे त्यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी योगाचे महत्व अधोरेखित करताना प्राणायाम व ध्यानधारणा जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी योगामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास घडतो, असे प्रतिपादन केले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर तसेच के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी मार्गदर्शन करत पंधरा दिवस चालणाऱ्या या नि:शुल्क योग शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती शेलार यांनी केले, तर सूत्रसंचालन सविता पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन किरण महाजन यांनी मानले. या योग शिबिरात योग प्रशिक्षिका स्वाती शेलार व सविता पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल पाटील, शेखर पाटील, स्वाती पाटील, गणेश पाटील, माधुरी सोनवणे, प्रीती बियाणी, निशिता पेंढारकर व गुंजन जाधव यांनी विशेष सहकार्य केले.