नागरिकांचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य! –नगरसेवक नितेश चौधरी.

एरंडोल नगरपरिषदेकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी फवारणी मोहीम सुरू. प्रभाग क्रमांक ९ मध्ये नगरसेवक नितेश चौधरी यांच्या उपस्थितीत उपक्रम राबविण्यात आला.

एरंडोल (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत एरंडोल नगरपरिषद तर्फे नियमित फवारणी मोहीम राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्रजी ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सातत्याने सुरू असून आज प्रभाग क्रमांक ९ मध्ये ही मोहीम पार पडली.


यावेळी नगरसेवक नितेश चौधरी यांच्या उपस्थितीत फवारणी करण्यात आली. शहरात डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी नियमितपणे विविध भागात फवारणी करत आहेत.


नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न कायम असल्याचे दिसून येत आहे.