एरंडोल येथे राज्यस्तरीय कलावंत मेळावा उत्साहात.
एरंडोल - शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या 'शरद रत्न पुरस्कार सोहळा' या सोहळ्या बाबत एरंडोल येथे घेण्यात आलेला राज्यस्तरीय कलावंत मेळावा अत्यंत उत्साहापुर्ण वातावरणात संपन्न झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष तथा कोयना रत्न राजाराम बुवा शेलार होते तर चित्रपट निर्देशक विनोद शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक कदम,प्रविण तांबे, जळगाव जिल्हा अध्यक्ष फकिरा खोकरे, नवल पाटील,म़गल पाटील ,दिनकर पाटील,सुकलाल पाटील, अधिकार पाटील, संतोष नाईक,रवि पाटील,सतिलाल भोई गौरख मोरे,आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला दिपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आले. गावागावांत पिढ्यानपिढ्या कला जतन करणाऱ्या कलाकारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रतिष्ठानचे उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी यावेळी प्रतिपादन केले.
जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा भजनसम्राट फकिरा खोकरे यांनी मुंबई होणाऱ्या भव्य वर्धापन दिन सोहळ्यात जास्तीत जास्त कलावंत येणार असल्याची ग्वाही दिली.या मेळाव्यास जळगाव जिल्ह्यासह परिसरातील विविध खेड्यापाड्यांतून महिला व पुरुष कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.
संपूर्ण सभागृह कलाकारांच्या उत्साहाने आणि सांस्कृतिक उर्जेने भारावून गेले होते.आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व कलाकारांसाठी सुसज्ज एसी हॉल तसेच बुफे भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा आरोग्य दूत विक्की खोकरे केले तर आभार प्रदर्शन रामचंद्र पाटील यांनी मानले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राजपूत,विक्की खोकरे, वाल्मीक राजपुत,रंजनाबाई पाटील,माया पाटील, उषाताई गुरव,सुरेखा पाटील,मनिषा गुरव,सरला पाटील, मालुबाई सोनवणे,दिपाली पाटील,निकिता पाटील,गोरख पाटील,कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
