दादासाहेब दि. शं. पाटील महाविद्यालयात 'हिंदी पंधरवाडा' उत्साहात साजरा; पोस्टर प्रदर्शनात मनोज जोगी प्रथम.

 

Jalgaon Local News Today", "जळगाव ताज्या बातम्या"

एरंडोल (प्रतिनिधी):

येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे 'हिंदी पंधरवड्या'निमित्त विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित पोस्टर प्रदर्शन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल २३ विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.



स्पर्धेत मनोज जोगी याने प्रथम, सायली माळी हिने द्वितीय, स्नेहल सोनार हिने तृतीय, तर कावेरी महाजन हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.


मातृभाषेसोबत हिंदीचे ज्ञान आवश्यक: अमितदादा पाटील



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष अमितदादा पाटील म्हणाले, "मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेचे ज्ञान आणि आदर असणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदी ही केवळ संवादाचे माध्यम नसून देशातील विविध संस्कृती व भाषांना जोडणारा मुख्य दुवा आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो."



प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी स्पर्धेच्या युगात भाषिक कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट करत भाषेच्या सौंदर्यावर मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांनी जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे आणि रोजगाराच्या संधींमध्ये हिंदीचे वाढते स्थान यावर प्रकाश टाकला.


सुटसुटीत नियोजन व सूत्रसंचालन...



कार्यक्रमप्रसंगी हिंदी विभागप्रमुख डॉ. स्वाती शेलार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. नरेंद्र तायडे व डॉ. रेखा साळुंखे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कु. हर्षदा पाटील हिने सूत्रसंचालन, तर कु. अदिती पाटील हिने आभार मानले. कु. पल्लवी पाटील व कु. पल्लवी महाजन यांनी स्वागतगीत सादर केले.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ए. टी. चिमकर, डॉ. राम वानखेडे, डॉ. मीना काळे, डॉ. सोपान साळुंखे, प्रा. सागर विसपुते, डॉ. सविता पाटील व शेखर पाटील यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.