जळगाव | प्रतिनिधी - जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये ‘समन्वय 2026’ स्नेहसंमेलनाचा आजपासून उत्साहात शुभारंभ होत आहे. या स्नेहसंमेलनाची सुरुवात आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने होत असून पुढील सात दिवस विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
भावी वैद्यकीय तज्ञांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या ‘समन्वय’ स्नेहसंमेलनाचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. माया आर्विकर व प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
* कार्यक्रमांचे वेळापत्रक (Samnvay 2026 Schedule)*
१२ एप्रिल – आर्ट गॅलरी उद्घाटन
१३ एप्रिल – प्रश्नमंजूषा, प्रोम नाईट, होम बॅण्ड
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष कार्यक्रम, टॅलेंट शो
१५ एप्रिल – फॅशन शो
१६ एप्रिल – जेआर नाईट
१७ एप्रिल – डीजे नाईट
१८ एप्रिल – सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप
* समन्वय 2026 चे वैशिष्ट्य*
‘समन्वय’ हे केवळ स्नेहसंमेलन नसून विद्यार्थ्यांच्या कला, व्यक्तिमत्त्व विकास आणि टीमवर्कचा उत्कृष्ट संगम आहे. वैद्यकीय शिक्षणासोबतच सांस्कृतिक जडणघडणीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो.
* नागरिकांना आवाहन*
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

