एरंडोल : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर युवकांच्या सहभागातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. “जय ज्योती, जय क्रांती” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महात्मा फुले पुतळा चौक येथे ‘महात्मा फुले युवा क्रांती मंच’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ६५ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. उपनगराध्यक्ष सौ. सुनीता माळी व नगरसेविका सौ. आरती महाजन यांनीही रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्य व जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा समाजाने अवलंब करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष शोभाताई महाजन, उपनगराध्यक्ष सुनीता माळी, नगरसेविका आरती महाजन, नगरसेवक प्रा मनोज पाटील, नगरसेवक अनिल महाजन, नगरसेवक मयूर महाजन, नगरसेवक रवींद्र महाजन, नगरसेवक योगेश महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक अतुल महाजन, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष दुर्गादास महाजन, शिवसेनेचे जगदीश पाटील, युवा क्रांती मंचचे माजी अध्यक्ष कैलास महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर बिऱ्हाडे, प्रमोद महाजन, आनंदा चौधरी,राजेंद्र महाजन, गजानन महाजन, प्रल्हाद महाजन, आय जी माळी, अरुण महाजन, पी जी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी महात्मा फुले चौकापासून शहरातील प्रमुख मार्गांवर सवाद्य मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा क्रांती मंचचे अध्यक्ष राहुल माळी, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव भावेश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


