जळगाव, दि. 29 एप्रिल (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर व वरणगाव परिसरात गॅस एजन्सींमध्ये घडलेल्या मोठ्या सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ₹4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटना काय?
फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे (वय 58) यांनी 25 एप्रिल 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. अज्ञात चोरट्यांनी एजन्सीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून सुमारे ₹3 लाख 11 हजार 800 किमतीचे 100 भरलेले गॅस सिलेंडर चोरी करून नेले होते.तसेच, 26 फेब्रुवारी 2026 रोजी वरणगाव येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. भारत गॅस वितरक विभागातील नरेंद्र उत्तमराव अहीरे (वय 51) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपींनी गोडाऊनमधून ₹72,846 किमतीचे 57 गॅस सिलेंडर चोरले होते.
पोलिसांची कारवाई...
दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि संशयित वाहनांचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपींचा शोध लावला.
🔹 आरोपींची माहिती
पोलिसांनी खालील तीन आरोपींना अटक केली आहे:
शेख बिलाल शेख नबी (वय 32, रा. कासोदा, ता. एरंडोल)
वसीम खान शाबीर खान (वय 31, रा. तांबापुरा, जळगाव)
चेतन सुरेश कोटे (वय 38, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) चौकशीत आरोपींनी दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
जप्त मुद्देमाल...
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला:
62 भरलेले गॅस सिलेंडर (₹1,55,000)
95 रिकामे सिलेंडर (₹1,42,500
एक मोपेड (₹1,30,000)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹4,27,500
पुढील तपास सुरू...
अटक आरोपींना फैजपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांकडून सुरू आहे. या टोळीचे आणखी काही साथीदार आहेत का, याचा शोधही पोलीस घेत आहेत.
