जळगावात ACB ची कारवाई: भांडे वाटप KYC नावाखाली 100 रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी रंगेहाथ अटकेत.

चिंचोली येथे गृह उपयोगी संच वाटपात भ्रष्टाचार उघड; टेबलाखाली सापडले 41 हजारांहून अधिक रोख.

Jalgaon News ACB Jalgaon Bribery Case Maharashtra KYC Fraud Chincholi News Government Scheme Corruption Breaking News Jalgaon



जळगाव | प्रतिनिधी : शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना कशा प्रकारे लाच द्यावी लागते, याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघड झाला आहे. चिंचोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत एका महिला कर्मचाऱ्याला १०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.



मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत गृह उपयोगी संच मिळवण्यासाठी ९ एप्रिल रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर १५ एप्रिल रोजी संच वाटपासाठी त्यांना चिंचोली येथे बोलावण्यात आले.यावेळी उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्याने ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली १०० रुपये देण्याची मागणी केली. या प्रकारामुळे संशय आल्याने तक्रारदाराने त्वरित ACB कडे तक्रार दाखल केली.



ACB पथकाने पडताळणी करून सापळा रचला आणि संबंधित महिला कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना पंचांसमक्ष पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. जळगाव) असे आहे.कारवाईदरम्यान तिच्या टेबलाखालील पेटीतून तब्बल ४१,२५० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. त्यामुळे इतर लाभार्थ्यांकडूनही अशाच प्रकारे पैसे उकळले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी पुढील गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू असून तपास सुरू आहे.

ACB कडून नागरिकांना आवाहन...


कोणत्याही शासकीय सेवेसाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी त्वरित ACB च्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ७५८८६६१०६४ वर संपर्क साधावा.