आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत पारोळा येथे शिवसेनेचा(शिंदे गट) मेळावा; नवीन नियुक्त्या जाहीर.

"Shiv Sena Erandol Melava Amol Patil"


Erandol pratinidhi 

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या सखोल पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, पारोळा येथे शिवसेनेचा भव्य विधानसभा मेळावा आणि बी.एल.ए. प्रतिनिधींची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या मेळाव्यात आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल-पारोळा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.



विजया लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन

पारोळा येथील विजया लॉन्सवर आयोजित या मेळाव्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी मोहिमेची कार्यकर्त्यांना सखोल माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यावेळी नवनवीन कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.



या दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या.

पक्षात नव्याने सक्रिय झालेल्या व अनुभवी अशा प्रमुख चेहऱ्यांना संघटनेत स्थान देण्यात आले आहे:

 * **जगदीश पाटील (खडके):** शिवसेना जिल्हा समन्वयक.

 * **जावेद मुजावर:** उपजिल्हाप्रमुख, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी.

 * **अभिजीत पाटील (माजी नगरसेवक):** उपजिल्हा समन्वयक.

 * **अतुल महाजन (एरंडोल):** तालुकाप्रमुख, शिवसेना ओबीसी सेल.

 * **ॲड. अहमद सय्यद:** तालुकाप्रमुख, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी.

 * **कुणाल महाजन (माजी उपनगराध्यक्ष):** शिवसेना तालुका समन्वयक.

 * **मोहन सैंदाणे:** युवासेना उपतालुकाप्रमुख.

 * **अनिल महाजन (नगरसेवक):** शहरप्रमुख, शिवसेना ओबीसी सेल.

 * **अल्ताफ खान:** शहरप्रमुख, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी.



*आमदार अमोल पाटील यांचे आवाहन..

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले की, "दिलेल्या नवीन जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून पक्ष बळकटीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत."




प्रमुख मान्यवरांची उपस्थिती..

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शालिग्राम गायकवाड, रुपेश माळी (जिल्हाप्रमुख, ओबीसी सेल), रवींद्र जाधव (तालुकाप्रमुख), सुदाम राक्षे (विधानसभा क्षेत्रप्रमुख), बबलू पाटील, कमलेश पाटील, शहरप्रमुख बबलू चौधरी यांच्यासह नगरसेवक एन.डी. पाटील, कृष्णा ओतारी, मयूर महाजन, अमोल तांबोळी, रवींद्र महाजन, परेश बिर्ला,आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.