आ. अमोलदादा पाटील यांच्या पुढाकारातून कांतााई नेत्रालयासोबत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
एरंडोल व पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आमदार मा. डॉ. अमोलदादा पाटील यांच्या पुढाकारातून कांतााई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. विशेष म्हणजे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्याधुनिक SICS पद्धतीने (विना टाका) केली जाणार असून, संपूर्ण उपचार प्रक्रिया रुग्णांसाठी विनामूल्य असणार आहे.
मोफत डोळे तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया (फक्त 20 मिनिटांत),ऑपरेशनसाठी ये-जा व्यवस्था मोफत ऑपरेशन नंतर औषधे व तपासणी पूर्णतः मोफत चष्म्याचा नंबर तपासून देण्यात येणार.
शिबिराची वेळ व ठिकाण:
एरंडोल:
प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला, सकाळी 9 ते दुपारी 1
स्थळ: आमदार संपर्क कार्यालय, बसस्थानक समोर.
पारोळा:
प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला, सकाळी 9 ते दुपारी 1
स्थळ: आमदार संपर्क कार्यालय, गजानन हौसिंग सोसायटी, चोपडा रोड.
ऑपरेशनसाठी पात्र रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच, केवळ रक्त तपासणीसाठी 300 रुपये शुल्क लागू शकते.
Q&A
