एरंडोल |Ambedkar Jayanti News
Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंती निमित्त एरंडोल शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी मिरवणुकीत सहभागी नागरिकांसाठी थंडगार शीतपेय (शरबत) वाटप करून सर्वांची मने जिंकली.
राज्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत सहभागी वयोवृद्ध महिला व भीम सैनिकांसाठी हा उपक्रम विशेष ठरला.शेकडो नागरिकांनी शीतपेयाचा लाभ घेतला. उपस्थितांनी विक्की खोकरे यांच्या कामाचे कौतुक केले . हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या समाज भूषण पुरस्कार प्राप्त फकिराजी खोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमा वेळी सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार,माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,जयंती उत्सव अध्यक्ष लखन बनसोडे,डॉ. अतुल सोनवणे, प्रशांत सोनवणे,रविंद्र चौधरी व पोलिस बांधव सहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमासाठी दुर्गेश खोकरे, रितीक खोकरे, जितू बोढरे, निखिल खोकरे यांसह अनेक युवकांनी परिश्रम घेतले.
Q&A
