“खरीपपूर्वी मोठा झटका? २७ एप्रिलपासून कृषी सेवा केंद्र बंद!”

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा इशारा;प्रलंबित प्रश्नांवर शासनाची दिरंगाई.

ठिकाण: एरंडोल

एरंडोल : राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत विक्री केंद्र बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक संघटनेच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी गजानन महाजन, भूषण पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह अनेक कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.

कृषी सेवा केंद्र बंद आंदोलन एरंडोल


बियाणे, खते व कीटकनाशक पुरवठ्यात अडथळे, कंपन्यांची लिंकिंग पद्धत,एचटीबीटी कापूस बियाणे निर्बंध,सिलबंद पॅकिंगमुळे तपासणीतील कारवाई,खत विक्रीतील एफओआर पद्धतीचा दबाव,नमुना तपासणीतील विलंब...कृषी विभागाकडून वारंवार आदेश दिले जात असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा व तालुका पातळीवरील विक्रेते एकत्र येत आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहेत.


या आंदोलनामुळे बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय गंभीर ठरू शकतो.विक्रेत्यांनी शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली असून, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



Q&A