जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे, प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला. त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी बौद्ध वंदना सादर केली.
या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा तायडे यांनी प्रथम तर शेख अल्तमश यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे यांनी भारतीय राज्यघटना व शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पाटील व डिंपल पाटील यांनी केले. हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

