एरंडोल : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय आ.अमोल पाटील यांच्यावतीने घेण्यात आला आहे. माजी सैनिक संघटना “खान्देश रक्षक”, एरंडोल यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत, त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ₹२५ लाख रुपयांचे सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आले आहे.
या नव्या सभागृहाच्या उभारणीमुळे संघटनेला विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच युवकाभिमुख उपक्रम राबविण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, एरंडोल शहरातील सामाजिक चळवळींना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या हितासाठी येणाऱ्या प्रत्येक मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न कायम ठेवला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

