“फार्मसी विद्यार्थ्यांना यशाचा ‘Rx’… एरंडोलमध्ये खास मार्गदर्शन!”

फार्मसी कार्यशाळा एरंडोल

एरंडोल | प्रतिनिधी :- एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारी “Rx for Success” ही प्रेरणादायी कार्यशाळा २२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडली. उद्योगविश्वातील संधी आणि करिअर नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला.


Statcode Solutions LLP, पुणे येथील संचालक तथा संस्थेचे माजी विद्यार्थी सौरभ पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी करिअर प्लॅनिंग, व्यक्तिमत्त्व विकास, इंडस्ट्रीमध्ये आवश्यक कौशल्ये आणि फार्मसी क्षेत्रातील वाढत्या संधींवर सविस्तर माहिती दिली.


सौरभ पाटील यांनी फार्मसीमध्ये डेटा आणि सांख्यिकीच्या वाढत्या महत्त्वावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. या सत्रामुळे करिअरविषयीच्या अनेक शंका दूर झाल्या आणि स्पष्ट दिशा मिळाली.


प्रा. जावेद शेख व प्रा. राहुल बोरसे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या प्रेरणेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी मानले. सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळा यशस्वी ठरली.





Q&A