कुस्ती संशोधनासाठी एरंडोलच्या प्राध्यापकाला पीएचडी.

एरंडोल | प्रतिनिधी

एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील क्रीडा विभाग प्रमुख प्रा. किशोर जयाजी वाघ यांना “आंतर विद्यापीठीय कुस्तीपटूंमध्ये आढळणाऱ्या दुखापतींचा चिकित्सक अभ्यास” या महत्त्वपूर्ण विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा किशोर वाघ पीएचडी कुस्ती संशोधन

प्रा. वाघ यांच्या संशोधनामुळे कुस्तीपटूंमध्ये होणाऱ्या दुखापतींचे स्वरूप स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.कुस्ती हा अत्यंत कष्टप्रद खेळ असल्याने खेळाडूंना वारंवार दुखापतींचा सामना करावा लागतो. या अभ्यासातून दुखापती टाळण्यासाठी शास्त्रोक्त उपाययोजना विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


या पदवी प्रदान समारंभात कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरीपीएचडी मार्गदर्शक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासो अमित पाटील यांनी प्रा. वाघ यांचे अभिनंदन करताना सांगितले की,“त्यांच्या संशोधनाचा थेट फायदा खेळाडूंना होणार असून हे कार्य प्रेरणादायी आहे.” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच एरंडोल परिसरातील क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्रा. वाघ यांचे अभिनंदन केले.



Q&A