एरंडोल | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर एरंडोल येथील आत्मा अनुभूती सेंटरमध्ये 'दहा कोटी नशामुक्त प्रतिज्ञा' महाअभियानाचा उद्घाटन व लॉन्चिंग सोहळा उत्साहात पार पडला. या अभियानाचे उद्घाटन एरंडोलचे नायब तहसीलदार अमोल बन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नशामुक्त भारत अभियानांतर्गत सुमारे 100 ते 200 माता-भगिनींनी बाबांच्या सानिध्यात नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून निरोगी व सुदृढ समाज घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास नायब तहसीलदार अमोल बन, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, नगरसेवक रविंद्र महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने नशामुक्त भारत अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उपस्थितांनी नशामुक्त भारताचा संकल्प करत व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त समाज निर्माण करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमास आत्मा अनुभूती सेंटरचे सेवेकरी, नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

