जामनेर शहरात २० सप्टेंबरला निर्माल्य संकलन.

 


 सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत उपक्रम..


जामनेर शहरात २० सप्टेंबरला निर्माल्य संकलन.


जामनेर, दि. १९ सप्टेंबर : गणेशोत्सवानंतर पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माल्याचे संकलन व योग्य व्यवस्थापन करण्यासाठी जामनेर शहरात रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी निर्माल्य संकलन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.


या उपक्रमाची सुरुवात व उद्घाटन सकाळी ९.३० वाजता होणार असून, त्यानंतर सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील विविध भागांतून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास माजी मंत्री ना. श्री. गिरीषभाऊ महाजन तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


निर्माल्य संकलनासाठी जामनेर नगर परिषद, जामनेर पोलीस स्टेशन, सर्व पत्रकार संघ तसेच सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र डंपिंग ग्राऊंड व डंपिंग वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्ती व पूजेचे निर्माल्य रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता आयोजकांकडे जमा करून या पर्यावरणपूरक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


फोटो ग्राफर : गणेश सातवे.


डंपिंग ग्राऊंड नियोजन : गणेश भास्कर बावस्कर, प्रल्हाद माळी, ईश्वर सोनवणे.

डंपिंग वाहन नियोजन : गिरीधर मोरे, कमलाकर पालवे.