एरंडोल महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्यांची ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात संपन्न; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत.

एरंडोल महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्यांची ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात संपन्न; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

 एरंडोल (प्रतिनिधी) :यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील (डी. डी. एसपी.) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे कला शाखेच्या प्रथम वर्षातील (F.Y.B.A.) विद्यार्थ्यांसाठी 'फ्रेशर्स पार्टी' व स्वागत समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करत महाविद्यालयीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.



विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवावे : अमित पाटील.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. अमित राजेंद्रजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी F.Y.B.A. च्या विद्यार्थ्यांना S.Y.B.A. व T.Y.B.A. च्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात अमित पाटील म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित होते."



प्रसारमाध्यमांत करिअरच्या भरपूर संधी : प्राचार्य डॉ. अनिल पाटील.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल जे. पाटील म्हणाले, "विद्यार्थी हे बागेतील टवटवीत उमलत्या फुलांसारखे असतात. आज मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावेत." तसेच, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आत्मा असल्याचे सांगत त्यांनी नियमित तासिकेला उपस्थित राहून आपला शारीरिक व मानसिक विकास साधण्याचे आवाहन केले.



सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाची सुरुवात चैताली धनगर व हर्षिता पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. आकांक्षा घोडेस्वार व आम्रपाली सोनवणे यांनी मनमोहक स्वागतगीत सादर केले. जुही परदेशी (T.Y.B.A.), अश्विनी व अफिया या विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन अनुभवांवर आपले मनोगत व्यक्त केले.



प्रास्ताविक आर्ट असोसिएशनच्या प्रमुख प्रो. डॉ. मीना काळे यांनी केले. "महाविद्यालय म्हणजे ज्ञानासोबतच व्यक्तिमत्त्व विकासाला आणि स्वप्नांना आकार देणारे व्यासपीठ आहे. अशा कार्यक्रमांचा उद्देश केवळ मनोरंजन नसून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण व सुप्त कलागुणांना वाव देणे हा असतो," असे मत त्यांनी व्यक्त केले.



अतिथी व संयोजकांची उपस्थिती

यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. डॉ. आत्माराम चिमकर, प्रा. डॉ. नरेंद्र तायडे, प्रो. डॉ. रामा वानखेडे, प्रो.डॉ. नितीन दांडेकर, प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. डॉ. सोपान साळुंखे, प्रा. डॉ. रेखा साळुंखे, प्रा. डॉ. स्वाती शेलार, प्रा. डॉ. हेमंत पाटील, प्रा. विजय गाडे व श्री. शेखर पाटील यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पाटील व आरती पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चैताली धनगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज जोगी, सुमित भोई, रोहित तायडे, दिनेश लोणार, भूमिका सोनवणे, रुचिता भोई, हर्षिता पाटील, कुणाल हटकर, भावेश हटकर, नम्रता चौधरी व महेश मोरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध खेळांच्या आनंदात आणि उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली.