प्रा. उमेश सूर्यवंशी यांना राष्ट्रीय परिषदेत उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणाचा 'द्वितीय पुरस्कार'.

जळगाव news

एरंडोल (जळगाव): दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. उमेश सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. चाळीसगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणात त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.



चाळीसगाव येथील राष्ट्रीय परिषदेत यश...

चाळीसगाव येथील बी.पी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ‘National Conference on Frontiers in Entomology – 2026’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सादर केलेल्या दर्जेदार संशोधनासाठी प्रा. उमेश सूर्यवंशी यांना ट्रॉफी, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.



या पारितोषिक वितरण सोहळ्याला जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक पराग मनसाराम, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर प्रमुख उपस्थित होते.


संस्था व महाविद्यालय परिवाराकडून कौतुक


प्रा. उमेश सूर्यवंशी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. अरविंद बडगुजर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


"संशोधन क्षेत्रातील प्रा. सूर्यवंशी यांची ही कामगिरी इतर प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी संशोधन कार्याला महाविद्यालय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!" — महाविद्यालय प्रशासन