एरंडोलच्या निशिका महाजनची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाजी; मिळवले द्वितीय स्थान व इलेक्ट्रिक सायकल पारितोषिक.

 

एरंडोलच्या प्रवक्ता अकॅडमीची विद्यार्थिनी निशिका ज्ञानेश्वर महाजन हिने नवसारी येथील राज्यस्तरीय पब्लिक स्पिकिंग स्पर्धेत २,००० स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक पटकावला. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते इलेक्ट्रिक सायकल देऊन तिचा गौरव करण्यात आला.

एरंडोल (प्रतिनिधी)Erandol News Marathi: गुजरातमधील नवसारी येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या,(Public Speaking Competition Navsari)भव्य राज्यस्तरीय पब्लिक स्पिकिंग (वक्तृत्व) स्पर्धेत एरंडोल येथील(Pravakta Academy Erandol) 'प्रवक्ता अकॅडमी'ची तेजोस्वी विद्यार्थिनी निशिका ज्ञानेश्वर महाजन हिने आपल्या अमोघ व प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.



महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल २,००० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत निशिका हिने आपल्या ओघवत्या शैलीने व प्रभावी मांडणीने परीक्षक आणि श्रोत्यांची मने जिंकली. तिच्या या उत्तुंग यशामुळे एरंडोल शहरासह प्रवक्ता अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



केन्द्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते गौरव या शानदार पारितोषिक वितरण समारंभास (CR Patil Water Resources Minister) केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते निशिका महाजन हिला उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह आणि 'इलेक्ट्रिक सायकल' पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आली. या प्रसंगी प्रवक्ता अकॅडमीचे संस्थापक रवींद्र पाटील आणि संचालक डॉ. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.(State Level Elocution Competition Result.)



निशिकाच्या या यशाबद्दल प्रवक्ता अकॅडमीचे शिक्षकवृंद, तिचे वर्गमित्र, पालक तसेच एरंडोल शहरातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.