एरंडोल, महाराष्ट्र: येथील 'सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्था' एरंडोलची १९ वी वार्षिक साधारण सभा अत्यंत खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडली. या सभेत संस्थेच्या वार्षिक कामकाजाला मंजुरी देण्यात आली, तसेच ८० वर्षे वयाटप केलेल्या ज्येष्ठांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीने सभा संपन्न...
सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश पांडे उपस्थित होते. तसेच फेस्कॉम खान्देशचे माजी अध्यक्ष जगतराव पाटील, फेस्कॉमचे जिल्हा समन्वयक एस. बी. महाजन, विधितज्ञ अर्नु धांडे आणि चोपडा संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महत्त्वाचे कार्यक्रम व सत्कार सोहळा
कार्यक्रमाची सुरुवात: दीपप्रज्वलन, प्रार्थना आणि दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून झाली.
प्रास्ताविक: संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी प्रास्ताविक केले.
वार्षिक अहवाल: सचिव विनायक कुलकर्णी यांनी विषयपत्रिकेवरील विषय, २०२५-२६ चा अहवाल आणि जमाखर्च-ताळेबंद सादर केला, ज्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
विशेष सत्कार (८०+ वयोगट): संस्था स्थापनेपासून ८० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारपत्र, शाल, श्रीफळ आणि बुके देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये भगवान महाजन (९३ वर्षे), गणेश पाटील (९२ वर्षे), जगन्नाथ महाजन (८९ वर्षे), श्रावण महाजन, भीमसिंग जाधव, मधुकर तिवारी, पंडित बडगुजर, वासुदेव शिंपी, पंडित ठाकूर, भानुदास गुजर, रमेश पाटील, धोंडू वाणी, तुकाराम महाजन, रामदास पाटील, राजाराम पाटील, सखाराम ठाकूर, सत्यनारायण तोतले, विमलबाई सोनार, सीताराम महाजन, बाबूलाल लोहार, प्रा. सुरेश पांडे, प्रा. एस. पी. पाटील, रमेश जोशी, दयाराम पाटील, विष्णू वाणी, सुधाकर वानखेडे, योगराज देवरे, देविदास जाधव, अरविंद परदेशी आणि डॉ. अमृतराव पाटील आदींचा समावेश होता.
वाढदिवस सोहळा: सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सदस्यांचे वाढदिवस देखील यावेळी साजरे करण्यात आले.
मार्गदर्शन व मनोगत...
प्रमुख वक्ते प्रा. सुरेश पांडे यांनी आपल्या एक तासाच्या विनोदी व प्रभावी शैलीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावर करावयाचे उपाय यावर मार्गदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय भाषणात डी. टी. चौधरी यांनी ज्येष्ठांनी आपले उर्वरित आयुष्य आनंदात कसे घालवावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.
सहकार्य आणि आभार..
सभेस १५० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष जाधवराव जगताप, संचालक कवी निंबा बडगुजर, पी. जी. चौधरी, प्रा. शिवाजीराव अहिरराव, नामदेवराव पाटील, गणेशाप्पा, सुरेश देशमुख, वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, भगवान महाजन व जगन महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी नामदेवराव पाटील यांनी पसायदान म्हटले, तर आभार प्रदर्शन निंबा बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या साहाय्याने सर्व सदस्यांसाठी भोजनाची व्यवस्था संस्थेचे अध्यक्ष अरुण माळी आणि ज्येष्ठ सभासद रामदास पिंगळे (ज्वेलर्स) यांच्यातर्फे करण्यात आली होती.
