वैद्य डॉ. सुरेश पाटील निसर्ग उपचार गौरव सन्मानाने सन्मानित...एरंडोल व सुरतचा गौरव.

Dr Suresh Patil Erandol Nisargopchar Sanman Buldhana

एरंडोल (विशेष प्रतिनिधी):येथील मूळ रहिवाशी तथा सध्या सुरत (गुजरात) येथे कार्यरत असलेले वैद्य डॉ. सुरेश पाटील यांना बुलढाणा येथे ‘निसर्ग उपचार गौरव सन्मानाने’ सन्मानित करण्यात आले आहे. निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


आयुष इंटरनेशनल व AGMA तर्फे आयोजन...

बुलढाणा येथील आयुष इंटरनेशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. (A.G.M.A.) आणि योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘निसर्गोपचार गौरव सन्मान सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातून अनेक नामवंत निसर्गोपचार तज्ञ उपस्थित होते.


निसर्गोपचार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल...

कार्यक्रमात एरंडोलचे भूमिपुत्र डॉ. सुरेश पाटील यांच्या आरोग्य व निसर्गोपचार क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला. संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन डॉ. नितीन राजे पाटील यांनी केले होते. याप्रसंगी विविध भागांतून आलेल्या तज्ञांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.