रोटरी क्लब अमळनेरतर्फे सी. आर. पाटील स्कूलमधील २०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण.

 

रोटरी क्लब अमळनेरतर्फे सी. आर. पाटील स्कूलमधील २०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

अमळनेर (प्रतिनिधी):स्थानिक तांबेपुरा परिसरातील (C R Patil English Medium School Amalner) सी. आर. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना (School Bag Distribution) स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या उपक्रमात शाळेतील सुमारे २०० गरजवंत विद्यार्थ्यांना आकर्षक आणि सर्वांगिण सोयींनी युक्त अशा स्कूल बॅग्स वितरित करण्यात आल्या.


विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पाठीवरील शैक्षणिक साहित्याचा भार सोयीस्कर व्हावा, या उद्देशाने (Rotary Club Amalner) रोटरी क्लबतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. नवीन बॅग्स मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.


या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील,चेलाराम सेनानी, प्रोजेक्ट चेअरमन विनोद थोरात, रोटे. प्रदीप पारख, रोटे. विवेक देशमुख, रोटे. दिलीप भावसार, रोटे. सी. बी. वशिष्ठ, रोटे. अजय रोडगे, रोटे. मनोज पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन पाटील आणि सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेची माहिती मकसूद बोहरी यांनी दिली.