एरंडोलमध्ये आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी.

 राष्ट्रीय लहुजी दलाचा दिमाखदार सोहळा | Erandol News.

एरंडोल येथे राष्ट्रीय लहुजी दलाच्या वतीने आयोजित आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व समाजबांधव - Erandol News


प्रतिनिधी बातमीदार, महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा (Erandol / Jalgaon News / Khandesh)


एरंडोल (Erandol News): येथील राष्ट्रीय लहुजी दलाच्या (Rashtriya Lahuji Dal) वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी भागोजी उर्फ लहुजी वस्ताद साळवे (Lahuji Vastad Salve Jayanti) यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार तथा  कार्यकर्ते कमर अली सय्यद या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.



या जयंती उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक नितेश चौधरी, ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते शेख सांडू यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोहन चव्हाण, जावेद मुजावर आणि नगरसेवक नितेश चौधरी यांनी आपले विचार मांडताना लहुजी वस्ताद साळवे यांच्या क्रांतिकारी कार्याचा, देशभक्तीचा आणि सामाजिक समतेच्या विचारांचा गौरव केला.



या कार्यक्रमास गणेश सपकाळे, विकास सपकाळे, माधवराव जगताप, बबन राखपसारे, संजीव वाघ, भारत लोंढे, संदीप राखपसारे, भूमिका चव्हाण, राणी मोराणकर, आनंद खंदारे, भारत कसबे, दीपक चित्ते, धर्मा खलसे, सतीश चित्ते, एकनाथ चव्हाण यांच्यासह परिसरातील असंख्य समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अरुण नेटके यांनी मानले.