एरंडोल शासकीय वसतिगृहात जनजाती गौरव दिन उत्साहात.

 ९० जणांची आरोग्य तपासणी व रेशनकार्ड वाटप|Erandol News.

एरंडोल येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात जनजाती गौरव दिनानिमित्त आयोजित शिबिरात उपस्थित मान्यवर व लाभार्थी - Erandol News

प्रतिनिधी बातमीदार, महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा (Erandol / Jalgaon News / Khandesh)

एरंडोल (Erandol News): भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda Jayanti) यांच्या १५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि समाजसुधारणेच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने 'जनजाती गौरव सप्ताह' (Janjatiya Gaurav Saptah) साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबर २०२६ रोजी एरंडोल येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात विशेष कार्यक्रम व लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गोपाळ पाटील हे होते.

या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार अमोल बन, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वाय. एच. महाले, डॉ. धीरज मराठे आणि तालुका पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एरंडोल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली.

शिबिरादरम्यान एकूण ९० लाभार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी (Free Health Checkup) करण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची तांत्रिक अडचणींमुळे बंद पडलेली बँक खाती पुन्हा कार्यान्वित करून देण्यात आली. यासोबतच १३ महिला लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या बचत गट योजना आणि 'राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजने'ची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल विजय गाढे, सोनबर्डी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक भूषण पाटील, अधीक्षक दिगंबर पाटील, पातरखेडे आश्रमशाळेचे अधीक्षक किशोर झोळणे यांच्यासह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र तिरभाने यांनी केले.