एरंडोलच्या केवडीपुरा आदिवासी सेवावस्तीत नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि डॉ. गीतांजली ठाकूर यांच्याकडून आगळीवेगळी दिवाळी साजरी!

एरंडोलच्या केवडीपुरा आदिवासी सेवावस्तीत नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि डॉ. गीतांजली ठाकूर यांच्याकडून आगळीवेगळी दिवाळी साजरी!

एरंडोल;-दिवाळी हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून तो वंचितांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्याचा आणि समाजातील उपेक्षित घटकांना सोबत घेण्याचा सण आहे. याच उदात्त सामाजिक जाणिवेतून Erandol Municipal Council चे लोकनियुक्त नगराध्यक्ष Dr Narendra Thakur आणि नगरसेविका Dr Gitanjali Thakur यांनी एरंडोल शहरातील केवडीपुरा आदिवासी सेवावस्तीत जाऊन तेथील नागरिकांसोबत अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.

वंचितांच्या दारी जाऊन वाटला आनंद

उत्सव कोणताही असो, त्याचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने डॉ. ठाकूर कुटुंबाने केवडीपुरा वस्तीतील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट दिली. याप्रसंगी नागरिकांना दिवाळीचा पारंपरिक फराळ आणि आगामी थंडीच्या दिवसांची गरज लक्षात घेऊन ऊबदार चादरींचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या संवेदनशील आणि आत्मीय उपक्रमामुळे आदिवासी बांधव व भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

दुष्काळाचे भान ठेवून टाळला अनावश्यक खर्च

“जेथे खूप अंधार आहे, तिथे पणती लावूया” या विचाराने प्रेरित होऊन डॉ. ठाकूर कुटुंब नेहमीच राजकीय कामांसोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असते. आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही अनावश्यक खर्च न करता, तोच निधी वंचितांच्या कल्याणासाठी वापरत त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीचे आणि अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या समाजोपयोगी उपक्रमासाठी Sukhkarta Foundation चे श्री. शेखर बुंदेले, किसनभाऊ गवळी, श्री. राहुल शिंदे, श्री. समीर खान, पवन गवळी तसेच शालिकभाऊ नाईक आणि वासुभाऊ गायकवाड उपस्थित होते.