एरंडोल हादरलं! ‘खोट्या अधिकाऱ्यांची’ खंडणी रॅकेट उघड.

 एरंडोल | Fake Officer Extortion Case | जळगाव news एरंडोल शहरात चहा विक्रेत्याला अन्न भेसळ विभागाचा अधिकारी असल्याचा बनाव करून ₹१० हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.पीडित गजानन माधवराव महाजन (वय ४१, रा. माळीवाडा, एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० एप्रिल रोजी दुपारी काही व्यक्ती पांढऱ्या कारमधून त्यांच्या दुकानात आले. त्यापैकी एकाने स्वतःला “अन्न भेसळ अधिकारी” म्हणून ओळख देत तपासणीचा बहाणा केला.

एरंडोल फेक अधिकारी खंडणी


 “लोकप्रतिनिधीलाच इतका वेळ थांबावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” — आ.अमोल पाटील



तपासणीदरम्यान काहीही आढळले नाही. मात्र, आरोपींनी स्वतः आणलेला गुटखा दुकानात असल्याचे भासवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी ₹१० हजारांची मागणी करण्यात आली.घटनास्थळी उपस्थित असलेल्या नगरसेवक मयूर महाजन,रुपेश महाजन व अतुल मराठे यांच्या मदतीने महाजन यांनी उसनवार पैसे गोळा करून आरोपींना ₹१० हजार दिल्याचे समोर आले आहे. पैसे घेताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.


एरंडोल फेक अधिकारी खंडणी


या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी अमोल पाटील स्वतः एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, गुन्हा नोंदवण्यास विलंब झाल्याने त्यांना सुमारे चार तास ठिय्या द्यावा लागला.


सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बनावट अधिकाऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.


 (सूत्रांची माहिती...)

Q&A