एरंडोल | Gutkha Raid Erandol | Food Safety Action एरंडोल शहरात प्रतिबंधित गुटखा विक्रीवर प्रशासनाने मोठा घाव घातला असून अन्न व औषध प्रशासनाने २० एप्रिल २०२६ रोजी धडक कारवाई करत तीन पानटपऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण ₹२४,१९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून धाड – तीन दुकाने सील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागांतील तीन पान सेंटरवर छापे टाकण्यात आले.
सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही. पुढची कारवाई उत्पादक आणि पुरवठादारांवर होणार.”
— किशोर बाविस्कर
कुरेशी पान सेंटर (अनिस कुरेशी) ₹१५,५८८ किमतीचा विमल व राजनिवास गुटखा साठा श्री कृष्णा पान सेंटर (राहुल मराठे) ₹६,५६९ किमतीचा विमल, रजनीगंधा, सुगंधी जर्दाचामुंडा पान सेंटर (सुरेश माळी)₹२,०४० किमतीचा पानमसाला जप्त केलेला साठा आरोग्यास घातक असल्याने तो ताब्यात घेऊन तिन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत. संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच BNS (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
शहरात खळबळ – पुढेही मोहीम सुरू या कारवाई नंतर एरंडोलमधील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पुढेही अशी मोहीम सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
(सूत्रची माहिती..)
Q&A
