शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रशासनाला कडक इशारा.. आ. अमोल पाटील.

 पारोळा | Erandol Vidhansabha | Shet Rasta योजना पारोळा येथे २२ एप्रिल २०२६ रोजी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित रस्ते प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.



शेत रस्ता बैठक पारोळा



आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा या बैठकीचे अध्यक्षस्थान अमोल पाटील यांनी भूषवले. तहसील कार्यालय, पारोळा येथे झालेल्या या बैठकीला महसूल, कृषि, पोलीस व पंचायत विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




शेतरस्त्यांवरील अडथळ्यांचा सखोल आढावा बैठकीत ग्रामीण भागातील शेत/पाणंद रस्त्यांच्या समस्या, अतिक्रमण, प्रलंबित प्रस्ताव आणि कामांतील अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.अधिकाऱ्यांना पुढील प्रमुख सूचना देण्यात आल्या:शेत रस्ते तात्काळ मोकळे करणे,अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई,प्रलंबित प्रस्तावांना गती देणे,प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित उपाययोजना,कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखणे,“टाळाटाळ नको, काम वेळेत पूर्ण करा”आमदारांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला इशारा दिला की:“शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या. कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत.”





 “मुख्यमंत्री बळीराजा योजना” ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून, शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी सुकर आणि कायमस्वरूपी रस्ते उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. पुढेही बैठका सुरू राहणार.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अशा आढावा बैठका सातत्याने घेतल्या जाणार असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Q&A