हैदराबाद vs चेन्नई IPL 2026 थरारक सामना.

 मुंबई | IPL 2026 News (Marathi)

आयपीएल २०२६ मधील एक अत्यंत रोमांचक सामन्यात Sunrisers Hyderabad ने Chennai Super Kings वर १० धावांनी मात करत चाहत्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. Indian Premier League मधील हा सामना Rajiv Gandhi International Stadium येथे रंगला. हैदराबादचा तुफानी प्रारंभ Abhishek Sharma याने अवघ्या २२ चेंडूत ५९ धावांची  धडाकेबाज खेळी करत पॉवरप्ले मध्येच सामन्याचा रंग बदलला.Travis Head नेही २३ धावांचे योगदान देत भक्कम पायाभरणी केली.मधल्या फळीत काही झटपट विकेट्स पडल्या, पण Heinrich Klaasen याने ३९ चेंडूत ५९ धावांची जबाबदारीची खेळी करत संघाला सावरले.शेवटच्या षटकांत खालच्या फळीने महत्त्वाच्या धावा जोडत हैदराबादने २० षटकांत १९४/९ असा मजबूत स्कोअर उभारला.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई थरारक सामना



चेन्नईची झुंज अपुरी...

१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने वेगवान सुरुवात केली.Ayush Mhatre (३० धावा, १३ चेंडू) आणिMatthew Short (३४ धावा) यांनी आशा जिवंत ठेवली.मधल्या फळीत Shivam Dube आणि सरफराज खान यांनी प्रयत्न केले, पण वाढती रनरेट त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. चेन्नई १८४/८ पर्यंतच मजल मारू शकली.



मालिंगाचा निर्णायक स्पेल..

हैदराबादचा विजय पक्का करण्यातEshan Malinga याचा मोठा वाटा ठरला.त्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेत सामन्याचे पारडे फिरवले.Nitish Kumar Reddy यानेही २ विकेट्स घेत चांगली साथ दिली.



महत्त्वाचे हायलाइट्स...

अभिषेक शर्माची स्फोटक ५९ धावांची खेळी

हैदराबादचा १९४ धावांचा दमदार स्कोअर

मालिंगाचा ३/२९ चा मॅच-विनिंग स्पेल




 गुणतालिकेवर परिणाम...

या विजयामुळे हैदराबादचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी प्लेऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.चेन्नईसाठी मात्र मधल्या षटकांतील कमकुवत कामगिरी चिंतेचा विषय ठरली आहे. पुढील सामने – प्लेऑफसाठी निर्णायकKolkata Knight Riders vs Rajasthan Royals (कोलकाता) Punjab Kings vs Lucknow Super Giants (चंदीगड)हे सामने प्लेऑफच्या शर्यतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.



Q&A