जळगावात कोण ठरलं स्टार? मेडिकल विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी!

 जळगाव | Medical College Cultural News Dr. Ulhas Patil Medical College च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात जबरदस्त यश मिळवत जळगावचे नाव राज्यभर गाजवले आहे. राज्यस्तरीय गायन स्पर्धेत त्यांनी मानाचे पुरस्कार पटकावत महाविद्यालयाचा गौरव वाढवला.


जळगाव गायन स्पर्धा विजेते विद्यार्थी



Maharashtra University of Health Sciences, नाशिक येथे झालेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पंदन स्पर्धेतही बाजी,राज्यस्तरीय स्पंदन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवत पुन्हा एकदा आपली छाप सोडली.तिन्ही क्षेत्रात दमदार सादरीकरण या यशामागे तीन विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे:


भावेश जाधव – गायन

ऋषभ भुते – तबला

स्वरूप काळेकर  हार्मोनियम

 गायन, तबला आणि हार्मोनियम या तिन्ही क्षेत्रात उत्कृष्ट सादरीकरण करत त्यांनी सर्वांगीण कौशल्य दाखवले.या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे.


Q&A