जळगावात काय घडलं? इतक्या संशोधन पेपर्ससह आंतरराष्ट्रीय परिषदेची धडाकेबाज सुरुवात!

जळगाव | ICREST 2026 Conference Newsगोदावरी फाउंडेशन संचलित Godavari Foundation यांच्या Godavari Engineering College मध्ये ICREST 2026 (आंतरराष्ट्रीय परिषद) मोठ्या उत्साहात पार पडली. ही परिषद Dr. Babasaheb Ambedkar Technological University, IQAC आणि IIC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.


ICREST 2026 जळगाव परिषद उद्घाटन



२१ एप्रिल २०२६ रोजी परिषदेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. महेश पाटील, उपसमन्वयक डॉ. अतुल बर्‍हाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



 ९८ संशोधन पेपर्स सादर


या परिषदेत देशभरातून संशोधकांनी सहभाग ९८ संशोधन पेपर्स सादर करण्यात आली कॉम्प्युटर ४९ पेपर्स, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम:२२,मेकॅनिकल: ११, इलेक्ट्रिकल:११बेसिक सायन्सेस:५ निवडक संशोधन पेपर्स Scopus Indexed Journals मध्ये प्रकाशित होणार आहेत.





प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की:5G, 6G, Edge Computing आणि Generative AI या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.विद्यार्थी स्टार्टअप आणि AICTE पोर्टलद्वारे नवकल्पना करत आहेत




मुख्य वक्त्या डॉ. बेदात्री मौलिक (Amity University, Noida) यांनी“Energy Efficient Driving” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले—प्रदूषण आणि पारंपरिक वाहनांचे धोके,रोड सेफ्टी आणि अपघातांची कारणे,ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम्स (Auto Braking, Cruise Control, Parking)इलेक्ट्रिक वाहन आणि ऊर्जा व्यवस्थापन,Toyota Prius चे उदाहरण देत त्यांनी पॉवर मॅनेजमेंट समजावले.





प्रत्येक शाखेसाठी तज्ञ परीक्षक नियुक्त करण्यात आले होते.पुणे, अमरावती, जळगाव येथील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. संशोधन आणि नाविन्याला चालना डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की:

👉 दरवर्षी संशोधनाचा स्तर वाढत आहे

👉 विकसित भारतासाठी संशोधन महत्त्वाचे आहे


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल पाटील यांनी केले.


Q&A