नाशिक | विशेष प्रतिनिधी.
कलेचा वारसा जपणारे आणि आपल्या कौशल्याने महाराष्ट्राच्या मातीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील दिग्गज कलाकारांना गौरवण्यात आले.
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगली संध्याकाळ.
नाशिकच्या ऐतिहासिक पं. सा. नाट्यमंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष सुनील मोंढे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक सुभाषजी सोनवणे,प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली कुलकर्णी,प्रा.सोमनाथ मुठाळ आणि कवयित्री सुनीता वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील गुणवंतांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोण ठरले पुरस्काराचे मानकरी?
पुण्यातील आंतरराष्ट्रीय बाल कवयित्री अजया मुळीक यांच्यासह पुणे, नाशिक, गोंदिया, मुंबई आणि नागपूर अशा विविध जिल्ह्यांतील कलावंतांचा यात समावेश होता. प्रामुख्याने अभिनेत्री राणी जाधव,सुमती टापसे,अजिंक्य सोनवणे,प्रा.छाया बोरकर,अरुण शेलार,शिवाजी लोमंटे आणि डॉ.सुकीर्ती शर्मा यांच्यासह अनेक रत्नांचा सन्मान करण्यात आला...
"कलावंत विचार मंच गेल्या १० वर्षांपासून तळागाळातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे."-सुभाषजी सोनवणे (ज्येष्ठ साहित्यिक)
परिश्रम आणि नियोजन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाटील लिंबे वडगावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले, तर प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सुप्रिया गवळे, आनंद साळवे आणि रज्जाक शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
Q&A
