एरंडोल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल येथील शितल अकॅडमीमध्ये भव्य बक्षीस वितरण समारंभ व विविध कार्यक्रम उत्साहात पार पडला . कार्यक्रमास नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात उपनगराध्यक्षा सुनीताताई माळी, ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश महाजन, अतुल महाजन, कुणाल महाजन, नगरसेविका आरती महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन, शारदा मराठे, भारती गुजर व विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे संचालक योगेश महाजन, राजेश महाजन, सानिका कुलकर्णी व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

