एरंडोल :- दि.१४ एप्रिल २०२६ रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अभिवादन करत त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ पराग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “सफलतेची गुरुकिल्ली शिक्षणातूनच प्राप्त होते” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य संदेश अधोरेखित करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन शक्य आहे, यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत, त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा श्रद्धा शिवदे, सूत्रसंचालन प्रा. जावेद शेख तर आभार व्यक्त केले नरेंद्र पवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तसेच मा. सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन महामानवाच्या कार्याची आठवण करून देत समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
अशा प्रकारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जपणूक करण्याचा संदेश देऊन संपन्न झाला.

