![]() |
| Batmidar Jalgaon News Erandol. |
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर होते. प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ. बालाजी पवार उपस्थित होते.
कौशल्य विकासावर मार्गदर्शन...
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना विविध नवीन कौशल्ये आत्मसात करून त्यांचा संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फिल्ड प्रोजेक्टची आखणी व अंमलबजावणी करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याची माहिती त्यांनी दिली.
अर्थशास्त्र विभागातील प्रा. विजय गाढे यांनी ‘ऑन जॉब ट्रेनिंग’चे स्वरूप, ते पूर्ण करण्याची पद्धत तसेच शिक्षणासोबत मिळणारे व्यावसायिक व व्यावहारिक फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. बालाजी पवार यांनी ऑन जॉब ट्रेनिंग आणि फिल्ड प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात व कौशल्यांमध्ये भर पडते, असे प्रतिपादन केले.
फिल्ड प्रोजेक्ट व गुणदान पद्धतीची माहिती...
दुसऱ्या सत्रात अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एस. वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना फिल्ड प्रोजेक्टच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात फिल्ड प्रोजेक्टचा उद्देश, प्रकल्पाची रूपरेषा (Outline) तयार करण्याची पद्धत, प्रत्यक्ष प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार गुणदान पद्धती याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि फिल्ड प्रोजेक्टबाबत आवश्यक असलेले शैक्षणिक तसेच व्यावहारिक मार्गदर्शन मिळाले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अमित राजेंद्र पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या आयोजनासाठी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
