कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर भरारी | Jalgaon News.
प्रतिनिधी बातमीदार, महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा (Jalgaon / Erandol News / Khandesh)
जळगाव (Jalgaon News): गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (Godavari College of Engineering Jalgaon) मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी भूषण शांताराम घुले याची देशातील नामांकित विमाननिर्मिती व संरक्षण क्षेत्रातील संस्था असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited - HAL), बेंगळुरू येथे 'कनिष्ठ कार्यकारी अभियंता' (Junior Executive Engineer) पदावर निवड झाली आहे.
भूषण याने महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना नियमित अभ्यासासोबतच तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यविकासावर विशेष भर दिला. त्याने ऑटोकॅड (AutoCAD) आणि क्रेओ (Creo) या संगणकाधारित अभियांत्रिकी डिझाइन सॉफ्टवेअरचे सखोल प्रशिक्षण पूर्ण करून कॅड आधारित डिझाइन क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. पुस्तकी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे त्याच्या करिअरला योग्य दिशा मिळाली आणि याच तांत्रिक कौशल्यांचा त्याला एचएएलच्या निवड प्रक्रियेत मोठा लाभ झाला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते भूषण घुले याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे, अधिष्ठाता व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. तुषार कोळी, अधिष्ठाता (आयपीआर) डॉ. किशोर महाजन, डॉ. पंकज बोंडे आणि टी अँड पी समन्वयक प्रा. भालचंद्र सुरवाडे उपस्थित होते. तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही भूषणचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दर्जेदार तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर दिला जातो. भूषण घुलेची एचएएलसारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेत झालेली निवड ही महाविद्यालयाच्या या उपक्रमांची यशस्वी पावती असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.
